सातारा : केंद्र व राज्य शासनाच्या आदेशानुसार एक एप्रिलपासून सातारा जिल्ह्यातील 45 वर्षांवरील नागरिकांना कोविडचे मोफत लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी नोंदणी करून लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केले आहे.
जिल्ह्यातील कोविड 19 अंतर्गत लसीकरण मोहिमेत जिल्ह्यातील सर्व हेल्थ केअर वर्कर व फ्रंट लाईन वर्कर यांचे कोविड लसीकरण करण्यात आले आहे. आता एक एप्रिलपासून लसीकरण करण्यासाठी नागरिकांना https://selfregistration.cowin.gov.in या लिंकचा वापर करून नोंदणी करावी, तसेच ज्या व्यक्तींना ऑनलाईन नोंदणी करता येणार नाही, त्यांनी आधार कार्ड घेऊन लसीकरण केंद्राचे ठिकाणी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत नोंदणी करून लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
सर्वधर्मसमभाव जोपासणारे कॉंग्रेसचे नेतृत्व हरपले
दरम्यान, सध्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालय, सामान्य रुग्णालय, सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र असे 79 शासकीय व 10 खासगी ठिकाणी कोविड लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा सर्वसाधारण रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कऱ्हाड व फलटण, ग्रामीण रुग्णालय मेढा, महाबळेश्वर, खंडाळा, दहिवडी, वडूज, कोरेगाव, ढेबेवाडी, पाटण, मिशन हॉस्पिटल वाई, तसेच जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र (ठोसेघर, येवती (ता. कऱ्हाड) केरळ, मुरुड, सळवे, सणबूर, सोनवडे (ता. पाटण) ही ठिकाणे वगळून) कस्तुरबा रुग्णालय गोडोली व कऱ्हाड या शासकीय रुग्णालयांमध्ये सकाळी 10 ते सायंकाळी पाच या वेळेत कोविड-19 चे लसीकरण मोफत देण्यात येणार आहे.
उषःकाल हाेता हाेता काळ रात्र झाली...! साता-यात खाद्यपदार्थ विक्रेते पाॅझिटीव्ह
ज्येष्ठ नगरसेवक राष्ट्रवादीत दाखल; सत्ताधारी गटास धक्का
नोंदणीकृत खासगी आरोग्य संस्था ऍन्को लाईफ सेंटर तामजाईनगर, संजीवन हॉस्पिटल सातारा, कृष्णा हॉस्पिटल कऱ्हाड, सह्याद्री हॉस्पिटल कऱ्हाड, शारदा हॉस्पिटल कऱ्हाड, गुजर मेमोरियल हॉस्पिटल कऱ्हाड, मानसी मेमोरियल हॉस्पिटल खंडाळा, पाटील हॉस्पिटल कोरेगाव, मंगलमूर्ती क्लिनिक सातारा, घोटवडेकर हॉस्पिटल वाई या ठिकाणी 250 रुपयांना प्रती कोरोना लशीचा डोस देण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
http://dlvr.it/RwY3Bs

