Coming soon

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - २७ मार्च २०२१

पंचांग -
शनिवार : फाल्गुन शुद्ध १४, चंद्रनक्षत्र पूर्वा, चंद्रराशी सिंह/कन्या,  चंद्रोदय सायंकाळी ५.३१, चंद्रास्त सकाळी ६.१६, सूर्योदय ६.३४, सूर्यास्त ६.४५, पौर्णिमा प्रारंभ उत्तर रात्रौ  ३.२७, भारतीय सौर चैत्र ६ शके १९४३.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१८४५ : क्ष किरणांचा शोध लावणारे जर्मन भौतिकशास्त्रज्ञ विल्हेम राँटजेन यांचा जन्म. त्यांना भौतिक शास्त्राचे पहिले नोबेल पारितोषिक मिळाले.
१९९२ : प्रसिद्ध साहित्यिक व गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले यांचे निधन.
१९९२ - ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा ‘तानसेन पुरस्कार’ प्रदान.
१९९४ - ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असा संदेश देणाऱ्या कविवर्य केशवसुत यांच्या ‘तुतारी’ कवितेच्या लेखनास १०१ वर्षे पूर्ण.
१९९७ - मराठी रंगभूमीवरील गायक-अभिनेते भार्गवराम आचरेकर यांचे निधन.
२००० - फाय फाउंडेशनतर्फे देण्यात येणारा ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ ज्येष्ठ निर्माते दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना जाहीर.
२००१ - लेफ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉप्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली. पायदळातील ‘लेफ्टनंट जनरल’ या हुद्‌द्‌याच्या तीस अधिकाऱ्यांपैकी ‘मराठा लाइट इन्फंट्री‘चे आठ अधिकारी झाले आहेत.

दिनमान -
मेष :
थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
वृषभ : सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. व्यवसायामध्ये वाढ करू शकाल.
मिथुन : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. गुरूकृपा लाभेल.
कर्क : मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. आर्थिक कामे यशस्वी होतील.
सिंह : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आरोग्याच्या तक्रारी कमी होतील.
कन्या : काहींचा आध्यात्मिक क्षेत्राकडे कल वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
तुळ : नवीन स्नेहसंबंध जुळतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.
वृश्‍चिक : जिद्दीने कार्यरत रहाल. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
धनु : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील.
मकर : खर्चाचे प्रमाण वाढेल. वाहने चालवताना काळजी घ्यावी.
कुंभ : दैनंदिन कामे पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल.
मीन : काहींची आध्यात्मिक प्रगती होईल तर काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

Edited By - Prashant Patil



from Tajya news Feeds https://ift.tt/3rsSkqE
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section