Coming soon

शेतीची आवड काही स्वस्थ बसू देना; वेकोलिच्या खाणीसाठी शेतजमीन अधिग्रहित झाल्याने घेतला हा निर्णय

चंद्रपूर : शेतकरी शेतात वेगवेगळे उत्पादन घेत असतात. ही अनेक वर्षांपासून चालत आलेली पद्धत आहे. मात्र, एका शेतकऱ्याने चक्क टेरेसवर शेती फुलविली आहे. या शेतीत त्यांनी पालेभाजी, फळांचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. हा आगळावेगळा प्रयोग दुर्गापूर येथील मुुकंदा पुंडलिकराव आंबेकर या शेतकऱ्याने केला आहे.

दुर्गापूर येथील मुकुंदा आंबेकर यांची भटाळी परिसरात वडिलोपार्जित शेती आहे. शेती हा या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय होता. त्यामुळे मुकुंदा आंबेकर यांना जन्मजात शेतीविषयीची आवड होती. मात्र, वेकोलिची नवीन खाण या परिसरात सुरू झाली. या खाणीसाठी त्यांची शेतजमीन अधिग्रहित केली गेली. त्यामुळे आंबेकर कुटुंबाचा शेती हा मुख्य व्यवसाय बंद झाला. मात्र, मुकुंदा आंबेकर यांना शेतीविषयीची आवड स्वस्थ बसू देत नव्हती.

जाणून घ्या - अकोल्यातील मोहोड कुटुंबावर दुहेरी आघात; सकाळी वडिलांचे, तर दुपारी मुलाचे निधन

चंद्रपूर-दुर्गापूर मार्गावर त्यांनी नवीन घर बांधले. या घराचे बांधकाम करताना टेरेसवर शेती करण्याविषयीची कल्पना आर्किटेक यांना दिली. त्यानुसार घराचे डिझाईन करण्यात आले. घराचे बांधकाम पूर्ण झाल्याने आंबेकर यांनी छतावर शेती सुरू केली. तसेच घराच्या आजूबाजूच्या परिसरातही अनेक झाडे लावली. आजघडीला आंबेकर यांच्या घराच्या छतावर आणि परिसरात संत्री, मोसंबी, सिताफळ या फळझाडांसह टमाटर, कारले, लवकी, चवळी, मेथी लावण्यात आली आहे. सुमारे दोन हजार चौरस फुटात शेती करण्यात आली आहे.

अनेक शेतकरी आवडीने घरी येऊन शेती बघतात

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा आहे. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगांसाठी अधिग्रहित करण्यात आल्या. त्यामुळे अनेकांना आवड असूनही शेती करता येत नाही. मात्र, आवड असली की काहीही शक्‍य नाही, हे यातून सिद्ध होते. आजघडीला अनेक शेतकरी आवडीने घरी येऊन शेती बघतात. अनेकांनी आपल्या घरी अशाच प्रकारे बगीचा तयार केला असल्याचे मुकुंदा आंबेकर यांनी सांगितले.



from Tajya news Feeds https://ift.tt/3cuAdN6
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section