Coming soon

ग्रामीण भागातील नोंदणी कार्यालये धूलिवंदनाच्या दिवशी राहणार सुरू

पुणे - राज्य सरकारने मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी घोषित केलेल्या मुद्रांक शुल्काच्या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा, या उद्देशाने येत्या सोमवारी धूलिवंदनाच्या सुट्टीच्या दिवशीही ग्रामीण भागातील दस्त नोंदणी कार्यालये सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व दुय्यम निबंधक (श्रेणी १ व २ सह) कार्यालये नियमित सुरु राहणार असल्याचे मुद्रांक जिल्हाधिकारी (ग्रामीण) डी. पी. पाटील यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या सुट्टीच्या दिवशीच्या कामकाजाचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सह दुय्यम निबंधक वर्ग २ आणि दुय्यम निबंधक वर्ग २ ची मिळून २१ कार्यालये आहेत. ही सर्व कार्यालये शनिवारी (ता.२७) सुट्टीच्या दिवशीही सुरु ठेवण्यात आली होती. आजच्या सुट्टीच्या दिवशीही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्य सरकारने डिसेंबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीतील मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांसाठी मुद्रांक शुल्कात २ टक्के सवलत जाहीर केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना धूलिवंदनाच्या सुट्टीच्या दिवशी नेहमीप्रमाणे कार्यालयीन वेळेत दस्त नोंदणी करता येणार आहे.

Edited By - Prashant Patil



from Tajya news Feeds https://ift.tt/31pRcJT
via IFTTT

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Section