नागपूर : वजन कमी करण्यासाठी चयापचय क्रिया चांगली असणे महत्वाचे आहे. मात्र, धावपळीच्या जीवनशैलीमुळे चयापचय क्रियेवर परिणाम होतो. आपण अशा काही चुका करतो की या आपली चयापचय क्रिया मंद करतात. त्यामुळे आपले वजन वाढण्यास सुरुवात होते. चयापचय क्रियेची गती ही वय, लिंग, फॅट, मांसपेशी या सर्व बाबींवर अवलंबून असते. काहींमध्ये अनुवंशिक देखील असते. मात्र, आहारामधील काही चुका या तुमची चयापचय क्रिया कमी करून शकतात.
कमी खाणे -वजन कमी करण्यासाठी कमी कॅलरीज घेणे गरजेचे आहे. मात्र, आपल्या आहारापेक्षा अंत्यत कमी कॅलरीज घेतल्या तर तुमची चयापचय क्रिया मंद होण्याचा धोका असतो. त्यामुळे वजन कमी करायचे असले तरी कॅलरीज अधिक कमी करून नका. तुम्हाला भूख लागणार नाही इतकेच जेवण करा. कमी जेवल्याने शरीरामध्ये अन्नाची कमी जाणवते. त्यामुळे देखील वजन वाढते आणि चयापचय क्रियेवर परिणाम होतो.
जेवण करणे टाळणे -
वजन कमी करण्यासाठी किंवा अनियमित दिनचर्येमुळे अनेक जेवणे टाळतात. मात्र, कमी खाल्ल्यामुळे वजन कमी होते, हे मिथ आहे. त्यामुळे थोड्या थोड्या वेळानी थोंड थोड अन्न खायला पाहिजे. तसेच हेल्दी फूड खाणे गरजेचे आहे जंक फूड खाल्ल्याने देखील चयापचय क्रियेवर परिणाम होतो.
हेही वाचा - ...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा
फेड डायट -
कुठलेही डायट झटापट वजन कमी करेल यावर कधी विश्वास ठेवू नका. फेड डायट हे शरीरासाठी चांगले नसतात. ते आपल्या शरीरावर परिणाम करतात. वजन कमी करण्यासाठी आहार तक्ता तयार करणे गरजेचे आहे.
आहारामध्ये प्रोटीनचे कमी प्रमाण -
प्रत्येक जेवणामध्ये काही प्रमाणात प्रोटीन असणे गरजेचे आहे. मांसपेशी बनविण्यासाठी प्रोटीनची गरज असते. हेल्दी वजन ठेवण्यासाठी प्रोटीन महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. तसेच चयापचय क्रिया हेल्दी ठेवण्यासाठी देखील प्रोटीन चांगले असते.
व्हाइट कार्ब्स खाणे -
काही प्रमाणात कार्ब्स खाणे हे शरीरासाठी चांगले आहे. मात्र, व्हाइट ब्रेड, मैदा, पास्ता, रिफाइंट पीठ हे खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी गहू पास्ता, गव्हाचे पीठ, मल्टीग्रेन पीठ हे खाल्ल्याने चयापचय क्रिया सुदृढ राहते.
हेही वाचा - वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाणच्या आत्महत्याप्रकरणात समोर आले धक्कादायक कारण, आएफएस...
गोड पेय्य पीणे -
शुगर असलेले पेय्य पिणे मधुमेह, लठ्ठपणा सारख्या आजारांना आमंत्रण देतात. तसेच चयापचय क्रियेवर देखील त्याचा परिणाम होतो. त्यामुळे लिवरवर फॅट जमण्यास सुरुवात होते.
कॅफीन -
कॅफीन हे चयापचय क्रिया सुधारण्यास मदत करते. एक कप चहा किंवा कॉफी चयापचय क्रिया सुधारते. मात्र, काही लोकांना कॅफीनची गरज नसते. त्यांनी कॅफीनपासून दूर राहावे.
जीवनसत्व ड चे कमी सेवन -
चयापचय क्रिया सुदृढ राहण्यासाठी जीवनसत्व ड खाणे गरजेचे आहे. यासाठी आहारामध्ये टोफू, अंडी, मांसे आदी पदार्थांचा समावेश करा. त्यामुळे तुमच्या शरीराला जीवनसत्व ड मिळेल.
from Tajya news Feeds https://ift.tt/3tY9Ogu
via IFTTT
