कोल्हापूर : प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये दुपट्टा असतोच. खासकरून अनेक वेळा कोणत्यातरी सवलती वर दुपट्टा मिळतो तर कधी कधी आपल्या लुकला वेगळेपण देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक रंगीबेरंगी दुपट्टे आपण खरेदी करतो. परंतु वारंवार वापरल्यामुळे हे दुपट्टे एकतर फिकट होतात किंवा जुनी वाटू लागतात .अनेक वेळा हे दुपट्टे मध्ये कट होतात. अशावेळी आपण ते पुन्हा वापरू शकत नाही.
कपाटामध्ये ही असे अनेक दुपट्टे असतात जे आपण कधी वापरत नाही आणि बाहेर टाकू शकत नाही. त्यामुळे असे दुपट्टे विनाकारण जागा व्यापतात अशावेळी आपण जुन्या दुपट्टाचा वापर स्मार्ट पणे करू शकतो. आज या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला दुपट्टा चा वापर पुन्हा कशा पद्धतीने एका वेगळ्या ढंगामध्ये करू शकतो याबाबत माहिती देणार आहोत. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडेल.
बनवा कुशन चे कव्हर
जुने दुपट्टे हे आपल्या फर्निचर लूक सुद्धा बदलू शकतात. या दुपट्टा चा वापर करून आपण अत्यंत चांगल्या कुशन कवर तयार करू शकतो. हे फक्त आपल्या सोफासेट चा नव्हे तर आपल्या हॉलचा लुक सुद्धा बदलू शकतात. दुपट्टा पासून आपण आपल्या टेलर कडून किंवा आपण स्वतः घरात कुशन तयार करू शकतो. एक वेगळी गाठ बांधून बांधून आपण नवीन डिझाईन सुद्धा करू शकतो.
हेड बँड प्रमाणे करा वापर
जुने दुपट्टे एक चांगल्या पद्धतीचे हेड बँड होऊ शकतात. तुम्ही तुमच्या स्कार्प ला रिप्लेस करा आणि वेगवेगळ्या पद्धतीने केसात त्याचे स्टाईल करा. जर दुपट्टा मोठा असेल तर ते कापून त्याचा हेड बँड तयार करू शकतो.
बनवा खिडकीचे पडदे
जर तुमच्याकडे एकापेक्षा अधिक दुपट्टे असतील तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे पडदे त्या पासून बनवू शकता. तुम्ही हे पडदे खिडकीला वापरू शकता आणि तुमच्या घराला एक वेगळा लूक देऊ शकता.
बनवा श्रग
जर तुम्हाला तुमच्या ड्रेस वर दुपट्टा नको असेल तर तुम्ही ते एका वेगळ्या लूकने वापरू शकता. तुम्ही या दुपट्याचे श्रग बनवून त्याचा पुन्हा वापर करू शकता. खास करून हा श्रग उन्हाळ्यामध्ये जीन्स आणि टी-शर्ट वर एक वेगळा लूक देऊन जातो.
बनवा वेगवेगळ्या वस्तू
जुने दुपट्टे सुद्धा आपल्या स्टाईल ला एक वेगळा लूक देऊ शकतात कलरफुल दुपट्टा चा वापर करून तुम्ही त्याचे ब्रेसलेट किंवा नेक पिस बनवू शकता. एक वेगळा लूक देण्यासाठी तुम्ही नेक पिस च्या दुपट्टा ला पेंडल लावू शकता जे भारतीयच नव्हे तर वेस्टर्न ड्रेस वर सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिसेल.
बनवा पाऊच किंवा पोटली बॅग
जुन्या दुप्पट याचा वापर तुम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकता. जर तुमच्याकडे जुने बनारसी दुपट्टा असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही पोटली बॅग तयार करू शकता. ज्यामध्ये तुम्ही तुमचे छोटे-छोटे सहित्य तसेच सुट्टे पैसे ठेवण्यास मदत होते. घरा मध्ये छोटे-छोटे साहित्य ठेवण्यासाठीही मदत करेल. याशिवाय बाहेर जाताना तुम्ही दुपट्टा पासून बनवलेला पोटली बॅग बरोबर घेऊन जाऊ शकता.
from Tajya news Feeds https://ift.tt/3w54dqf
via IFTTT
