<a href="https://ift.tt/j1urzXp Capitals vs Sunrisers Hyderabad : आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL 2023) आजचा दुसरा सामना सनराजयर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात सामना रंगणार आहे. दिल्लीच्या घरच्या मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडिअमवर (Arun Jaitley Stadium) संध्याकाळी 7.30 वाजता दोन्ही संघांमध्ये रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर कोलकाता तिसऱ्या विजयासह हॅटट्रिकसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे हैदराबादला मागील तीन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्यामुळे संघ विजयी मार्गावर परतण्याचा प्रयत्न करेल

IPL 2023 SRH vs DC : दिल्ली आणि हैदराबाद आमने-सामने

डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली आणि एडन मार्करमच्या नेतृत्वात कोलकाता हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. गुणतालिकेतील सर्वात शेवटच्या दोन संघांमध्ये आजची लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल गुणतालिकेत हैदराबाद संघ नवव्या क्रमांकावर तर दिल्ली शेवटच्या दहाव्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघ आजच्या सामन्यात विजय मिळवून पॉईंट्स टेबलमध्ये उडी घेण्याचा प्रयत्न करतील, यामध्ये कोण यशस्वी होईल, ते आजच्या सामन्यानंतर कळेल.

Arun Jaitley Stadium Pitch Report : कशी असेल खेळपट्टी?

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमच्या (Arun Jaitley Stadium) मैदानावर अनेक वेळा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहेत. आयपीएलमध्ये अनेकवेळा या मैदानावर संघाने 200 च्या पुढे धावा केल्या आहेत. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी टी-20 सामन्यात फलंदाजांसाठी अधिक फायदेशीर ठरली आहे. अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. येथे चेंडू बॅटवर चांगला येतो आणि फलंदाज याचा आनंद घेतात.

DC vs SRH, Playing 11 : दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग 11

DC Probable Playing 11 : दिल्ली कॅपिटल्स

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट, मिचेल मार्श, मनीष पांडे, सरफराज खान, अक्षर पटेल, अमन हकीम खान, रिपल पटेल, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, इशांत शर्मा.

SRH Probable Playing 11 : सनरायझर्स हैदराबाद

हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, अब्दुल समद, मयंक मार्कंडे, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

<a href="https://ift.tt/rVQuk90 vs SRH Match Preview : दिल्ली विजयाची हॅटट्रिक मारणार? हैदराबाद विरुद्ध लढत; हेड टू हेड आकडेवारी काय सांगते पाहा...

from sports https://ift.tt/IeH5nCA
via IFTTT