मालवण (सिंधुदुर्ग) - जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात दक्षिण-नैऋत्येकडील वाऱ्याचा जोर काल सायंकाळपासून वाढला आहे. यामुळे समुद्रात काही बदल झाल्याचे दिसून येत आहे. शिवाय यामुळे वातावरणातील उष्म्यात मोठी वाढ झाली आहे. पुढील दोन-तीन दिवस अशीच परिस्थिती राहणार असून उष्म्यात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काल सायंकाळपासून दक्षिण-नैऋत्येकडील वाऱ्यांचा जोर वाढण्यास सुरवात झाली आहे. या वाऱ्यांमुळे समुद्रातील लाटांची दिशाही बदलली आहे. आज दिवसभर अधूनमधून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने येत्या काही दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. नैऋत्येकडील वाऱ्यामुळे वातावरणातील उष्म्यात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. उकाड्यात वाढ झाल्याने नागरिकही हैराण बनले आहेत. नैऋत्येकडील वाऱ्याचा जोर वाढल्याने केवळ लाटांच्या दिशा बदलल्याचे दिसून आले. मात्र समुद्रातंर्गत अन्य कोणतेही बदल झाले नसल्याचे पारंपरिक मच्छीमारांनी सांगितले. नैऋत्येकडील वाऱ्यांचा जोर आणखी दोन-तीन दिवस राहील. यामुळे वातावरणातील उष्म्यात मोठी वाढ होण्याची शक्यताही मच्छीमारांनी व्यक्त केली आहे.
पारंपरिक मच्छीमार मिथुन मालंडकर म्हणाले, ""किनारपट्टी भागात दक्षिण-नैऋत्येकडील वाऱ्याचा जोर वाढला आहे. यापूर्वीही उन्हाळ्यात नैऋत्येकडील वारे वाहत होते. या वाऱ्यामुळे समुद्री लाटांच्या दिशा बदलल्या आहेत. सध्या मासळी मिळत नसली तरी या वाऱ्यांचा मासेमारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता नाही. आज दिवसभर ढगाळ वातावरण होते शिवाय उष्म्यातही कमालीची वाढ झाली आहे. आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहील मात्र या वाऱ्यांमुळे पाऊस पडण्याची शक्यता नाही.'' विदर्भात काही दिवसांपूर्वी झालेल्या गारपीठीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
संपादन - राहुल पाटील
from Tajya news Feeds https://ift.tt/2P6C4Pg
via IFTTT
