पुणे - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी जिल्हा परिषदेच्यावतीने आणखी प्रत्येकी १० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. यासाठी सुमारे ६० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणारआहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील ५५९ शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी सांगितले.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने मागील पाच वर्षांपासून सेंद्रिय शेती प्रोत्साहन योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी त्यांना विविध प्रकल्पांसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते. विशेषतः सेंद्रिय शेतीसाठी प्रत्येकी ६५ हजार रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाते. एकूण अनुदानापैकी गाय खरेदी करण्यासाठी प्रत्येकी ४५ हजार रुपयांचे अनुदान आणि उर्वरित २० हजार रुपये हे बायो-डायनामिक कंपोस्ट खत युनिट उभारणी, महाबिजचे मोफत ढेंचा बियाणे आणि गांडूळ कल्चरसाठी उपलब्ध करून देण्यात येते. शिवाय या प्रकल्पासाठी निवड झालेल्या शेतकऱ्यांना सलग तीन वर्षाचे सेंद्रिय शेती प्रमाणीकरणाचे प्रमाणपत्र आणि दोन दिवशीय सेंद्रिय शेतीबाबतचे प्रशिक्षण देण्यात येते, असेही पानसरे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात आज ६५६३ नवे कोरोना रुग्ण; ३९ रुग्णांचा मृत्यू
दरम्यान, चालू आर्थिक वर्षात (२०२०-२१) केंद्र पुरस्कृत नवीन राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्प योजनेंतर्गत ५५९ शेतकऱ्यांना बायोगॅस युनिट उभारणीसाठी अनुदान मंजूर झाले आहे. या योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १२ हजार रुपये तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी १३ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते. मात्र बायोगॅस प्रकल्प उभारणीसाठी प्रत्यक्षात अंदाजे ३० ते ३२ हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे हा प्रकल्प मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्यावतीने आणखी प्रत्येकी १० हजार रुपयांचे अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी २२ हजार रुपये तर, अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना प्रत्येकी २३ हजार रुपयांचे अनुदान मिळणार असल्याचे कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी सांगितले.
पुणे : अग्निशमनदलातील पदं भरतीला वेग येणार का?; तीन वर्षांपासून प्रस्ताव प्रलंबित
तालुकानिहाय लाभार्थी शेतकरी
आंबेगाव -३५, बारामती - ५६, भोर -२७, दौंड -६०, हवेली - २७, इंदापूर - ४९, जुन्नर - ४५, खेड - ५५, मावळ -५४, मुळशी -३०, पुरंदर -३९, शिरूर -५८ आणि वेल्हे -२४.
Edited By - Prashant Patil
from Tajya news Feeds https://ift.tt/3wg54oq
via IFTTT
