बारामती - कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी केले आहे. येत्या 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील सर्वांनाच लस दिली जाणार असून प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे, प्रत्येकाने लवकरात लवकर ही लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. बारामती शहर व तालुक्यात विक्रमी संख्येने लसीकरण झाले असून 15 जानेवारीपासून आजपर्यंत शासकीय 23394 व खाजगी दवाखान्यात 3098 अशा एकूण 26492 व्यक्तींनी आजपर्यंत लस घेतली आहे. ही संख्या विक्रमी आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान बारामती तालुक्यातील होळ, पणदरे, मुर्टी, मोरगाव, लोणीभापकर, सांगवी, काटेवाडी, डोर्लेवाडी व शिर्सुफळ या प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवार व मंगळवार या दोन दिवसांव्यतिरिक्त इतर दिवशी व बारामतीतील महिला शासकीय रुग्णालयात तसेच सुपे येथील ग्रामीण रुग्णालयात रविवार व्यतिरिक्त इतर दिवशी लसीकरण केले जात आहे. बारामतीतील देशपांडे हॉस्पिटल, गिरीराज हॉस्पिटल, मेहता हॉस्पिटल व बारामती हॉस्पिटल या दवाखान्यातही लसीकरण सुरु आहे.
पुणे जिल्ह्यात आज ६५६३ नवे कोरोना रुग्ण; ३९ रुग्णांचा मृत्यू
ज्या नागरिकांनी कोविशिल्ड ही लस घेतली आहे त्यांनी या पुढील लस घेण्याची जी तारिख आहे त्या तारखेनंतर पंधरा दिवसांनी लस घ्यावी तर ज्यांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे त्यांनी मात्र पहिली लस घेतल्यानंतर 28 दिवसांनी दुसरी लस घ्यावी, असेही मनोज खोमणे यांनी सांगितले. येत्या एक एप्रिलपासून ज्यांचे वय 45 वर्षांहून अधिक आहे अशा प्रत्येकाने आधारकार्ड घेऊन लसीकरणासाठी जवळच्या केंद्रावर जावे, असेही आवाहन करण्यात आले आहे. ज्यांनी नोंदणी केलेली नाही, त्यांनीही लसीकरण करण्यासाठी जावे असेही नमूदकरण्यात आले आहे.
पुणे : प्रमुख बाजारपेठांचे होणार फायर ऑडिट; महत्वाच्या बदलांची महापौरांची घोषणा
लस संपूर्ण सुरक्षित...
लस घेणे हे संपूर्ण सुरक्षित आहे, कोणीही लसीबाबत मनात कसलाही गैरसमज ठेवू नये, लस घेणे कोरोनावर मात करण्याच्या दृष्टीने महत्वाचे असून प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Edited By - Prashant Patil
from Tajya news Feeds https://ift.tt/31ngpot
via IFTTT
